Monday, October 31, 2005

दखल

'बंग' दांपत्याच्या कामगिरीची जगप्रसिद्ध 'टाइम' मासिकाने ह्या वेळी दखल घेतली आहे. २-नोव्हेंबर च्या अंकात त्यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम भागात बालमृत्यू निवारण, कुपोषण ह्या क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती दिली जाणार आहे. 'टाइस्म ग्लोबल हेल्थ समिट' मधे बालमृत्यू संबंधित आपले अनुभव मांडण्याची संधी ही त्यांना मिळाली आहे.

दोन-एक वर्षापुर्वी महाराष्ट्र भुषण या पदवीने डॉ. अभय आणि राणी बंग या दोहोंना गौरवण्यात आले होते. त्यानंतरही सातत्याने वृत्तपत्रांमधे आपल्या कार्यामुळे ते चर्चेत राहिले. बंग यांनी केलेल्या आरोग्यसमितीच्या शिफारशींचा सरकारने नोंद घेण्यापलीकडे काही उपयोग केला नाही हे मेळाघाट या बालमृत्यू प्रकरणात आपल्या समोर आलेच.

काही वर्षांपुर्वी डॉ. अभय बंग यांचे 'माझा साक्षातकारी ह्र्दयरोग' हे सुरेख पुस्तक वाचनात आले. वयाच्या ४४व्या वर्षी अचानक उद्भवलेल्या या रोगाच्या रुपाने साक्षात मृत्यच त्यांच्या समोर उभा ठाकला होता. पण याही परिस्थितीत त्यांच्या मनाने उभारी घेतली आणि या आजारापासुन स्वताची सुटका करुन घ्यायचा त्यांनी चंगच बांधला. व्यायाम आणि आहार नियंत्रण या शास्त्रोक्त पद्धतीचा त्यांनी आधार तर घेतलाच, पण त्याच्या जोडीला त्यांनी अध्यात्माचीही कास धरली. या ह्रुदयरोगाचे मुळ आपल्या विचारपद्धतीत, परिणामी जीवनप्द्धतीत आहे हे जाणुन घेउनच त्यांनी हे पाउल उचलले. समाजकार्याने प्रेरित असलेली माणसे सुद्धा चांगल्या कार्याच्या निमित्ताने का होइना पण मानसिक तणावा खाली असतात. त्याची परिणीती पुढे ह्रुदयरोगात होण्याची संभावना जास्त असतेच. डॉ. नीतु मांडके याच्या अकस्मात मृत्यूनंतर बंग यांचे ह्र्दयरोगाच्या या कारणाचा उहापोह करणारे लेख आले होते. आजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरावे असेच हे पुस्तक आहे.

सामाजिक आरोग्य ह्या क्षेत्रात काम करणाऱ्य त्यांच्या 'सर्च' या संस्थेची माहिती अनिल अवचट यांच्या लेखा द्वारे आधी वाचनात आली होती. जागतिक पातळीवर त्यांच्या कार्याची या आधीही नोंद घेतली गेली असेल या बाबत काही शंका नाही, परंतु आपल्या इतर प्रसिद्धी माध्यमांचे या घटनांकडे डोळेझाक करणे थोडे अस्वस्थ करते. आजच्या डॉक्टर्स ना सुद्धा त्यांच्या कार्याची ओळख नाही, तर सर्व सामान्य जनतेचे सोडुनच द्या. तरिही यासारख्या गोष्टींनी काहिही फरक न पडता बंग दांपत्य आणि त्यांसारखे इतर समाजकर्मी आपली कामे करतच राहतील. त्यांच्या कामापासुन अनेकांना स्फुर्ती मिळावी हीच इच्छा.



Reference Links:

http://www.loksatta.com/daily/20051101/mp06.htm

http://in.rediff.com/news/2003/apr/24maha.htm

http://www.ashoka.org/fellows/viewprofile3.cfm?reid=147712

0 Comments:

Post a Comment

<< Home