Tuesday, May 31, 2005

समस्या (Samasyaa)

समजा कोणी तुम्हाला सहज विचारले कि सध्या तुमच्या आयुष्यतील सर्वात कठिण समस्या कोणती आहे, तर तुम्ही काय उत्तरे द्याल? नाही, प्रत्येकाची उत्तरे वेगळी असतील याची कल्पना आहे मला. पण मुख्य मुद्दा हा आहे की स्वतंत्रपणे ह्याचा विचार तुम्ही आम्ही केला आहे का? माझ्या बाबतीत विचाराल तर मला शंका आहे कि मी पट्कन मुद्देसूद उत्तर देउ शकेन. आयुष्यात माझ्या समोर येणाऱ्या समस्यांचा विचार नक्कीच वेळोवेळी करत असतो, तरी पण या प्र्श्नाचे उत्तर मी कसे दिले असते हे मात मला सांगता येणार नाही. कदाचित बहुतेक जणांची हीच गत झाली असती. याचा अर्थ हाच की, आपण आपल्या प्रश्नांना योग्य अर्थाने हाताळत नाही, अथवा या प्र्श्नाचे उत्तर लागलीच तयार असते.
आता हे सांगणे आवश्यक आहे कि हे सर्व मी का विचारत आहे. २००५ विश्वसुंदरी स्पर्धेत हा प्रश्न जिला विचारला गेला, तिने त्यचे फार सुंदर उत्तर (खरे तर प्रामाणिक) दिले. ती म्हणाली, कि मी नेहमी सकरात्मक रहायचा प्रयत्न करते, परंतु हे मात खरे कि नेहमी असा अस दृष्टिकोण ठेवणे फार कठिण जाते. आणि हिच माझी सर्वात मोठी समस्या आहे. खरोखरचे हे उत्तर मनाला भावले, आणि फक्त माझ्याच नाही तर जज्जेसच्या देखील, आणि ती विजेती ठरली.
आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोण ठेवणे आवश्यक आहे हे सर्वांनाच समजत असेल, पण त्याचा आचार करणे किती जणांना जमते? म्हणुनच आपल्या सर्व समस्यांचे मूळ उमगून ज्यांनी हे ठरवले आहे की आयुष्य कायम सकारात्मक दृष्टिकोणातूनच जगावे, त्याना हे नक्की पटेल की आपल्या समोरची मुख्य समस्या काय आहे.
आता बाकी शिकण्याची अजून गोष्ट हि की आपली विचार प्रक्रिया हि सुटसुटीत असली पाहिजे, तरच आपल्याला आयुष्य अधिक सुलभतेने जगता येईल. आपले विचारच आपल्या आयुष्यातील घडणाऱ्या गुंतागुंतीला कारणीभूत असतात, हे काही वेगळे सांगायची गरज नको.

0 Comments:

Post a Comment

<< Home