Monday, May 30, 2005

निश:ब्द (NiShabd)

माझे घर मला टेकडीच्या पायथ्याशी हवे
शांत, आजुबाजूला झाडांचीच गर्दी
आवाज फ़क्त काय तो पाखरंचा
संध्याकाळी एकटेच टेकडीवर जावे
शहराकडे पाठ करून सूर्यास्त पहावा
हळुहळू पाखरंचा किलबिलाट हि विरुन जावा
संधिप्रकशात समोरचा निसर्ग पाहताना मन नि:शब्द व्हावे
विचारांचा गोंधळ संपून जावा
अशाच तंद्रित पावले घराकडे परतावी
देवापुढे एक दिवा लावावा
पुन्हा डोळे बंद करताना, मन नि:शब्द व्हावे
नि:शब्द

मला(च) आवडलेली माझी(च) कविता :-)

1 Comments:

At 9:04 PM, Blogger Akira said...

Good one!

 

Post a Comment

<< Home