Monday, May 30, 2005

गुलमोहोर (GulMohor)

दुपारची वेळ
रस्त्यावर कमी झालेली वर्दळ
शाळा सुटल्यावर उनाडणारी पोरं
घामाने निथळत भर्र्कन जाणारा पोस्टमन
निश़्चल पडलेला वारा
आणि दारासमोर पसरलेला गुलमोहोर

रस्त्याच्या कडेला पडलेली केशरी फुलं
पुन्हा झाडावर बसलेले पक्षी
खिडकीतून भुर्र्कन उडून जणाऱ्या चिमण्या
शांत पहुडलेले रस्ते
आठवणीत साठवलेले बालपण
आणि उन्हात विसावलेला केशरी गुलमोहोर

0 Comments:

Post a Comment

<< Home